मुंबई- मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'झुंड' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा 'झुंड'चा टीझर रिलीज झाला आहे.
या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अजय अतुलच्या संगीताने होते. झोपडपट्टीतील मुले एकत्र येऊन हाताला जे सापडेल त्याचा आवाज काढत ताल धरलेली दिसतात. याच ठेक्यावर चित्रपटाची स्टार कास्ट, निर्माते, क्रू मेंबर्स आणि दिग्दर्शकाचे नावही पडद्यावर झळकते. या पहिल्या टीझरमध्ये केवळ अमिताब बच्चन यांची एन्ट्री दिसते. इतर कलाकारांना अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.