महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ईटीव्ही भारत विशेष मुलाखत - अभिनेता श्रेयस तळपदे - etv bharat with welcome to bajrangpur

रामोजी फिल्म सिटीमध्ये वेलकम टू बजरंगपुर या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका करतोय अभिनेता श्रेयस तळपदे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ETV भारतने वेलकम टू बजरंगपुर च्या सेटवर जाऊन त्याच्याशी विविध विषयांवर बातचीत केली.

12585214
12585214

By

Published : Jul 27, 2021, 1:01 PM IST

हैदराबाद: रामोजी फिल्म सिटीमध्ये वेलकम टू बजरंगपुर या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका करतोय अभिनेता श्रेयस तळपदे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ETV भारतने 'वेलकम टू बजरंगपुर' च्या सेटवर जाऊन त्याच्याशी विविध विषयांवर बातचीत केली.

श्रेयस तळपदेशी विशेष मुलाखत

प्रश्न : 'वेलकम टू बजरंगपुर' हा चित्रपट 'वेलकम टू सज्जनपुर' चा सीक्वेल आहे का?

उत्तर - नाही. दोन्ही चित्रपटाचे विषय खूप वेगळे आहेत. वेलकम टू बजरंगपुर ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि वेलकम टू सज्जनपुर ही एक वेगळी गोष्ट आहे. वेलकम टू बजरंगपुर ही गोष्ट खूपच वेगळी आहे.

प्रश्न - तुम्ही अनेक चित्रपटात विनोदी भूमिका केल्या आहेत. तर या चित्रपटातही कोणती वेगळी भूमिका करण्यास मिळेल ?

उत्तर -हा चित्रपट विनोदीच असेल. यात मी एका सुशिक्षीत माणसाची भूमिका करत आहे. जो परदेशातून आलेल्या मुलीला मदत करतो.

प्रश्न - तुम्ही बॉलीवूडमध्ये आखे या चित्रपटापासून सुरूवात केली. त्यात एका चहावाल्याच्या भूमिकेपासून सुरूवात केली. मात्र, इक्बाल मुळे करियरला कलाटणी मिळाली ?

उत्तर -चहावाल्याची भूमिका चांगली झाली होती. मला सांगायला आनंद वाटतो की, तुम्ही माझ्याबद्दल चांगला अभ्यास करून आाला आहात. 'आंखें' या चित्रपटात मला अमिताभ बच्चन सोबत दोन सीन करायला मिळाले होते. मी अमिताभजींचा खूप मोठा चाहता आहे. पदार्पणातच मला अमितजींसोबत स्क्रीन शेयर करायला मिळणे ही मोठी गोष्ट आहे. इकबाल हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. मी आज जे काही आहे ते इकबालमुळे आहे. हैदराबाद आणि आंध्र पासूनच माझी सुरूवात झाली. कारण मी तेथेच इकबालचे शूट करत होतो.

प्रश्न - रामोजी फिल्म सिटी बाबत तुमचे मत काय ?कसा होता तुमचा अनुभव ? तुम्ही याआधीही येथे फिल्म शूट केली आहे का ?

उत्तर -रामोजी फ़िल्म सिटी ही सर्वात शूट करण्यासाठी चांगली जागा आहे. रामोजीला शूट करायचे असल्यास मला आनंद होतो. कारण येथील वातावरण खूप आनंददायक आहे. खूप प्रशस्त जागा, निसर्गरम्य वातावरण आणि मला सितारा हॉटेलमध्ये राहण्यास आवडते. मला हॉटेलचे जेवण आवडते. गोलमालचा प्रत्येक भाग,तसेच 'वेलकम टू सज्जनपुर' याचेही इथेच सूट केले आहे.

प्रश्न -वेलकम टू बजरंगपुर जो रामोजी फ़िल्म सिटीमध्ये शूट होत आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगशील ?

उत्तर - प्रेक्षकांनी आतापर्यंत मला खूप प्रेम दिले आहे. त्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की, माझ्या आगामी येणाऱ्या चित्रपटांना असाच प्रेम करा.

हेही वाचा -कंगना रणौतने शेअर केली 'धाकड'च्या अ‍ॅक्शन एक्सरसाइजची झलक

ABOUT THE AUTHOR

...view details