मुंबई - कुख्यात गुंड ओबेद रोडिओवाला याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता उद्यापर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मकोका न्यायालयातून रिमांड वाठवण्यासाठी पुढील आदेश घेण्याची सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
शाहरुख, महेश भट्टसह दिग्गजांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा ओबेद रोडिओवाला गजाआड - Mcoco court
शाहरुखच्या घराबाहेर गोळीबार करणारा, महेश भट्टसह दिग्गजांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा ओबेद रोडिओवाला गजाआड...मकोका कोर्टाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा...अमेरिकेत झाली होती अटक...
ओबेद रोडिओवाला याच्यावर शाहरुख खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा तसेच निर्माता महेश भट्ट यांच्या हत्येचा प्लान करणे आणि करीम मोरानी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे. तो रवि पुजारी गँगसाठी काम करीत होता. पोलीसांना गुंगारा देऊन तो अमेरिकेत निघुन गेला होता. मात्र काही दिवसापूर्वी त्याचा अमेरिकेतील व्हिसा संपला होता. तरीही तो तिथेच राहात होता. अखेर अमेरिकेतील न्यू जर्सी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ओबेद याच्यावर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजना खंडणीसाठी धमकवल्याचे आरोप आहेत. कोरिओग्राफर फराह खानवरदेखील हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.