महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हॅकर्सनी रचलेल्या सापळ्यात न अडकण्याचा ईशाने दिला नेटीझन्सना सल्ला - ईशाचे हॅक झालेले अकाऊंट पुन्हा सुरू

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने नेटिझन्सना रविवारी सायंकाळी हॅक केलेले इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू केल्यावर पडताळणीविना या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला.

Esha Deol'
ईशा देओल

By

Published : Jan 11, 2021, 3:57 PM IST

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने रविवारी सायंकाळी हॅक केलेले इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू केल्यावर नेटिझन्सना तपासणी केल्यानंतरच लिंकवर क्लिक करण्याचा इशारा दिला.

रविवारी संध्याकाळी ईशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक संदेश शेअर केला आणि जाहीर केले की तिचे हॅक केलेले खाते पुन्हा सुरू झाले आहे. नेटिझन्सना हॅकर्सनी रचलेल्या सापळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.

"नमस्कार मित्रांनो

माझे इन्स्टाग्राम खाते पुन्हा सुरू झाले आहे हे आपल्याला फक्त कळवायचे होते. मी माझ्या टीमचे तसेच इन्स्टाग्रमाच्या सुधांशु यांचे आभार मानत आहे. कृपया आपले खाते हॅक करणाऱ्यांपसून सावध रहा. विशेषतः अधिकृत असल्याशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करते. माझ्या पाठिशी राहिल्याबद्दल सर्वांचे आभार,'' असे ईशाने म्हटले आहे.

ईशाचे हॅक झालेले अकाऊंट पुन्हा सुरू

रविवारी सकाळी ईशा देओलने ट्विटरद्वारे माहिती दिली होती की तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे आणि नेटीझन्सना तिच्या अकाऊंटवरून येणाऱ्या कोणत्याही थेट मेसेजला उत्तर न देण्यास सांगितले होते.

हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम

ABOUT THE AUTHOR

...view details