महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ईशा देओलचा हा मराठमोळा लूक नेमका कशासाठी? जाणून घ्या कारण - radhya

आपले अनेक फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. आता पुन्हा ईशाने तिच्या लहनग्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

ईशा देओलचा मराठमोळा लूक

By

Published : Apr 1, 2019, 1:06 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये चित्रपटांतून प्रेक्षकांवर जास्त छाप न उमटवू शकणारी ईशा देओल सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. आपले अनेक फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. आता पुन्हा ईशाने तिच्या लहनग्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत ईशा आणि लेक राध्या दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघीही यात खास मराठमोळ्या अंदाजात दिसत आहेत. ईशाचा हा लूक कोणत्या चित्रपटासाठी आहे का? असा प्रश्न हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना पडत असेल. मात्र, हा लूक कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर ईशाने आपल्या लेकीसाठी केला आहे.

राध्याच्या शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी पहिल्यांदाच मायलेकीने स्टेजवर एकत्र डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ अद्याप समोर आला नसला तरी माय लेकीच्या या फोटोला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळताना दिसत आहे. ईशाचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांच चागंलंच लक्ष वेधत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details