टायगर श्रॉफचे नाव आले की चपळता आणि अप्रतिम शरीरसौष्ठव हे शब्द बरोबर येतातच. तो एक तरुण सुपरस्टार आहे ज्याचे सर्वाधिक तरुण आणि लहान मुलं फॅन्स आहेत. बरीच मुले मोठेपणी टायगर श्रॉफ बनण्याचे स्वप्न बाळगून असतात. त्याच्या ‘चार्म’ला तोड नाही असे त्याचे फॅन्स सांगत असतात. अत्यंत फिट बॉडी असलेल्या टायगर श्रॉफने आपल्या चित्रपटांतून खतरनाक ऍक्शन सीन्स लीलया केले. त्याचे ऍक्शन सीन्स त्याच्या फिमेल फॅन्सना वेड लावून जातात. त्याचे नृत्यकौशल्यही वाखाणण्याजोगे आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व रातोरात घडलेलं नाहीये. हे प्राविण्य मिळविण्यासाठी टायगरने अपरंपार कष्ट घेतलेले आहेत हे विसरून चालणार नाही. वर्षानुवर्षे समर्पण आणि मेहनतीमुळे तसेच मार्शल आर्टस् शिकून टायगरने ही बॉडी आणि नृत्य कौशल्य कमावले आहे.
चैतन्यमयी टायगर श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य! - टायगर श्रॉफचे मार्शल आर्ट्स
टायगर श्रॉफ लहान असल्यापासून मार्शल आर्ट्स आणि जिम्नॅस्टिकमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्याशिवाय तो नेहमी नृत्याच्या तंत्राच्या विविध प्रकारांचा सराव करीत असतो. तो एक उत्साही फुटबॉल खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तो विविध खेळ खेळत राहतो.
टायगर श्रॉफची चपळता