मुबंई - बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी अलिकडेच 'व्हाय चीट इंडिया' या चित्रपटात झळकला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र, लवकरच तो महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्याच्या आगामी चित्रपटात भूमिका साकारणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'बर्फ', असे आहे. या चित्रपटात अन्नु कपूर आणि सौरभ शुक्ला हेही भूमिका साकारणार आहेत. हे दोघेही 'जॉली एलएलबी - २' या चित्रपटात झळकले होते.