मुंबई- कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला सोमवारी (13 डिसेंबर) चार दिवस झाले आहेत. हे कपल सतत लग्नाशी संबंधित फोटो शेअर करत असते. हळदी आणि मेहंदी समारंभानंतर, कॅटरिना कैफने आता तिच्या लग्नाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅटरिनाने एक इमोशनल नोटही लिहिली आहे.
या फोटोंमध्ये लाल रंगाच्या वेडिंग ड्रेसमध्ये कॅटरिना कैफचा संपूर्ण वेडिंग लूक आता समोर आला आहे. कॅटरिनाचे हे फोटो पाहिल्यानंतर आता कळते की ती लग्नाच्या दिवशी खरोखरच खूप सुंदर दिसत होती. या फोटोंमध्ये कॅटरिनाच्या बहिणीही दिसत आहेत, ज्यांनी फुलांची चादर धरलेली दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना कॅटरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय भावनिक नोटही लिहिली आहे. ती लिहिते, 'जसे आम्ही मोठे झालो, तसे आम्ही बहिणींनी नेहमीच एकमेकांची काळजी घेतली. त्या माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहेत. आम्ही नेहमी एकमेकांना जमिनीशी जोडून ठेवतो. हे नेहमी असेच राहिले पाहिजे'.