मुंबई - आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांची जोडी असलेला 'ड्रीम गर्ल' चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता असल्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एवढंच काय तर हा चित्रपट आयुष्मानच्या चित्रपट करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी डबल डिजीट आकड्यांची दमदार ओपनिंग करणाऱ्या 'ड्रीम गर्ल' म्हणजेच आयुष्मान खुरानाचे एकता कपूरने आभार मानले आहेत.
'ड्रीम गर्ल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०.०५ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने आयुष्मानच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
हेही वाचा -आयुष्य तुझ्यासोबत आणखीच सुंदर वाटतं, ताहिराची आयुष्मानसाठी पोस्ट