मुंबई- निर्माती एकता कपूरच्या विरोधात सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर एकताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुजफ्फर न्यायालयात एकता कपूर, सलमान खान, करण जोहर, आदित्य चोप्रा, साजिद नादियाडवाला, भूषण कुमार आणि संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात ३०६, १०९, ५०४ आणि ५०६ या कलमांच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. ओझाने आरोप केला आहे की, सुशांतसिंहच्या आत्महत्येला बॉलिवूडचे हे दिग्गज जबाबदार आहेत.
सुशांत आत्महत्या प्रकरण मुजफ्फर न्यायालयात हेही वाचा - ''मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती'', सुशांतच्या वडिलांचे विधान
या आरोपांना उत्तर देताना एकता कपूरने लिहिलंय, ''सुशी याला कास्ट न केल्याची तक्रार दाखल केल्याबद्दल धन्यवाद. खरेतर मीच त्याला लॉन्च केले होते. वादग्रस्त सिध्दांत कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात या गोष्टीमुळे त्रस्त आहे. कृपया कुटुंबीय आणि मित्रांना शांततेने शोक करु द्या. सत्याचा विजय होईल. यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.''
वकील सुधीर कुमार ओझाने म्हटलंय की, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने केवळ बिहारला नाही तर संपूर्ण देशातील लोकांना हादरवून टाकले आहे.
हेही वाचा - करण जोहरवर बहिष्काराची सोशल मीडियावर मागणी, #जस्टिसफॉरसुशांत हॅशटॅग ट्रेंड