मुंबई- आयुष्मानला एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते 'ड्रीम गर्ल' सिनेमाची आतुरतेने वाट पाहात होते. अशात त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे, असं चित्रपटाचं कलेक्शन पाहता म्हणावं लागले. सिनेमाने पहिल्या दिवशी १०.०५ कोटींची कमाई केली होती.
दुसऱ्या दिवशी 'ड्रीम गर्ल'च्या कमाईत कमालीची वाढ, जाणून घ्या आकडे - new bollywood movie
शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत कमालीची वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं १६.४२ कोटींचा गल्ला जमावला आहे. म्हणजेच पहिल्या दिवशीपेक्षा तब्बल ६ कोटी जास्त जमवले आहेत
शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत कमालीची वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं १६.४२ कोटींचा गल्ला जमावला आहे. म्हणजेच पहिल्या दिवशीपेक्षा तब्बल ६ कोटी जास्त जमवले आहेत. केवळ २ दिवसात या चित्रपटानं २६.४७ कोटींचा आकडा गाठला आहे.
अशात आज रविवारच्या सुट्टीचा फायदाही सिनेमाला होणार, हे निश्चित. राज शांडिल्यद्वारा दिग्दर्शित या सिनेमात आयुष्मान खुराणा आणि नुशरत भारुचा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर एकता कपूरनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा आयुष्मानच्या फिल्मी करिअरमधील बिगेस्ट ओपनर ठरला आहे.