महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ड्रीमगर्ल'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई - nusrat bharucha

पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने अर्धशतक गाठण्याकडे वाटचाल केली आहे. हा चित्रपट आयुष्मानच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

'ड्रीमगर्ल'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या आत्तापर्यंतची कमाई

By

Published : Sep 16, 2019, 12:59 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट मागच्या आठवड्यात १३ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने अर्धशतक गाठण्याकडे वाटचाल केली आहे. हा चित्रपट आयुष्मानच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

पहिल्याच दिवशी 'ड्रीमगर्ल'ने १०.०५ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत गेले आहेत. दुसऱ्या दिवशी १६.४२ कोटी तर तिसऱ्या दिवशी १८.१० कोटीची कमाई करत 'ड्रीमगर्ल'ची आत्तापर्यंतची कमाई ही ४४.५७ कोटी इतकी झाली आहे.
या चित्रपटाने आठवडाभराच्या कमाईत 'राजी' (३२.९४ कोटी), 'स्त्री' (३२.२७ कोटी) आणि 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' (३५.७३ कोटी) यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या आकडेवारीची माहिती ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

हेही वाचा-...म्हणून एकता कपूरने मानले 'ड्रीम गर्ल'चे आभार, पाहा व्हिडिओ

आयुष्मान खुरानाने या चित्रपटात 'पूजा' नावाच्या मुलीचे पात्र साकारले आहे. त्यानेच या चित्रपटात मुलीचा आवाजही दिला आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा, अन्नु कपूर हे देखील त्याच्यासोबत या चित्रपटात झळकले आहेत. अन्नु कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, राज शांडल्य यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणं रंजक ठरेल.

हेही वाचा-चुकून लेडिज वॉशरुमध्ये घुसला होता आयुष्मान, 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनदरम्यान उलगडले धमाल किस्से...!

ABOUT THE AUTHOR

...view details