मुंबई - नुकतंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेला अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच एक नव्या धाटणीची कथा घेऊन ड्रीम गर्ल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
मुलांवर नाही विश्वास, मात्र आयुष्यमानवर ती फिदा; भेटा त्याच्या नव्या आशिकला - पुजा
आतापर्यंत आयुष्यमानने आपल्या दोन आशिक असणाऱ्या पुरुषांची ओळख करुन दिली. मात्र, यावेळची त्याची आशिक काही खास आहे. कारण ती मुलगा नसून मुलगी आहे.
या सिनेमात आयुष्मान एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, जी मुलीच्या आवाजात फोनवर बोलून अनेकांना आपल्या प्रेमात पाडते. पुजा नावाच्या या मुलीच्या मंजुळ आवाजाचे अनेक आशिक होतात. यातीलच एका-एकाची ओळख आयुष्मान व्हिडिओ शेअर करत करुन देत आहे.
आतापर्यंत त्यानं आपल्या दोन आशिक असणाऱ्या पुरुषांची ओळख करुन दिली. मात्र, यावेळची त्याची आशिक काही खास आहे. कारण ती मुलगा नसून मुलगी आहे. मुलं नेहमीच फसवतात, असा समज असणारी ही मुलगी पुजा म्हणजेच आयुष्मानच्या प्रेमात पडते. तिचाच व्हिडिओ आयुष्यमानने शेअर केला आहे. येत्या १३ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.