मुंबई - आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल' चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रिंकू सिंह निकुंभच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर चित्रपट जगतात शोक लहर पसरली आहे. सेलिब्रिटींबरोबरच तिच्या मृत्यूमुळे चाहतेही दुःखी झाले आहेत. रिंकू सिंह निकुंभच्या मृत्यूची माहिती तिची चुलत बहीण चंदा सिंह यांनी दिली.
रिंकू सिंह निकुंभ उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जात होती. टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'चिडीयाघर'मुळे तिने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते. रिंकू सिंह निकुंभ अखेर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘हॅलो चार्ली’ चित्रपटामध्ये दिसली होती. तिने 'चिडीयाघर'सह 'बालवीर' यासारख्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले होते.