माधुरी दीक्षित डॉ. नेने यांना तिच्या तालावर नाचायला लावते! - madhuri dikshit latest news
जेव्हा माधुरीला विचारले गेले की लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या पतीदेवांना, डॉ. नेनेंना, डान्सचा एखादा प्रकार शिकवला का, तेव्हा माधुरी म्हणाली, "मी त्यांना डान्स करायला शिकवले नसले तरी ते माझ्या तालावर नक्कीच नाचतात!"
मुंबई -बघायला गेलं तर प्रत्येक बायको नवऱ्याला आपल्या तालावर नाचवते असं समस्त नवरे मंडळींचं मत असल्याचं विनोदात म्हटलं जातं. बॉलीवूडची धक धक गर्ल, सदाबहार डान्सिंग दिवा, माधुरी दीक्षित सुद्धा याला अपवाद नसावी. कलर्सचा डान्स रियालिटी शो डान्स दीवानेच्या ग्रँड शुभारंभ प्रसंगी तुषार कालिया, धर्मेश येलांडे या सहकारी परीक्षकांसोबत आणि होस्ट राघव जुयाल सोबत या अभिनेत्रीने प्रश्नांना सामोरे जाताना तिच्या मनोरंजक आणि चलाख उत्तरांनी सर्वांना चकित केले. जेव्हा तिला विचारले गेले की लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या पतीदेवांना, डॉ. नेनेंना, डान्सचा एखादा प्रकार शिकवला का, तेव्हा माधुरी म्हणाली, "मी त्यांना डान्स करायला शिकवले नसले तरी ते माझ्या तालावर नक्कीच नाचतात!"