मुंबई- २०२० च्या थ्रिलर फिल्म 'मलंग' मध्या बॉलिवूड स्टार दिशा पाटनीला आपण अखेरचे पाहिले होते. कोरोना संकटानंतर अनेक कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर गेले होते. त्यात दिशाही होती. आता तिने आपल्या आगामी 'एक व्हिलन २' चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.
'बागी' स्टार दिशा पाटनीच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, "दिशा बरीच वर्कशॉप्स घेत आहे आणि चित्रपटासाठी संपूर्ण तयारीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासाठी ती बरीच वाचन सत्रेही करत आहे, तिने या कामाला प्राधान्य दिले आहे. ती लवकरच या 'एक व्हिलन २' च्या शुटिंगला सुरुवात करेल. "