मुंबई - पंजाबी स्टार दिलजित दोसंझला नुकत्याच रिलीज झालेल्या 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटासाठी मराठी शिकावे लागले. नवीन भाषा शिकणे सोपे नसल्याचे त्याने कबूल केले आहे. या चित्रपटात त्याची मध्यवर्ती भूमिका असून व्यक्तिरेखेची गरज म्हणून त्याला मराठी बोलता येणे आवश्यक होते.
याबद्दल दिलजीत म्हणाला, "प्रेमासाठी माणसाला काय काय करावे लागते? मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला प्रेयसीसाठी मराठी शिकावे लागले आणि मला सिनेमावर असलेल्या प्रेमापोटी मला ते करावे लागले. माझे पात्र सिनेमात अनेकवेळा मराठी बोलते. तो मुंबईचा एक मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बोलचालीचा हा एक भाग आहे."
हेही वाचा - 'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने सर्वांना केले चकित, आता अशी दिसतेय हर्षाली मल्होत्रा