मुंबई: सुशांतच्या चाहत्यांना आनंद देणारी गोष्ट घडली आहे. दिल बेचारा या चित्रपटाचा ताल धरायला लावणारा आकर्षक टायटल च्रॅक रिलीज करण्यात आलाय. यात सुशांत आणि संजना सांघी स्टेप्स करताना दिसतात.
2 मिनिट 44 सेकंद ट्रॅकमध्ये सुशांत फूट टॅपिंग गाण्यावर दिलखेचक नाचताना दिसत आहे.
गाण्याची पेप्पी ट्यून प्रेक्षकांना धुंद करणार याची या गाण्यामुळे खात्री वाटते.
व्हिडिओने यापूर्वीच इंटरनेटवर लाखो लाईक्स मिळविल्या आहेत. सुशांतसाठी कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळत आहे. काहींनी त्याच्या न-त्याच्या हालचालीचे कौतुक केलंय तर काहींनी त्यांच्या हास्यवर मन फिदा झाल्याचे म्हटलंय.
इंस्टाग्रामवर या गाण्याची घोषणा करत चित्रपटाची नायिका संजना सांघीने या टायटल ट्रॅकबद्दल लिहिलंय. मॅनीने त्याच्या पध्दतीने किझीच्या आयुष्यात प्रवेश केला. एकमेवाद्वितीय ए आर रहमानचे मधुर संगीत. ऐका प्रेम संगीताने त्याची जादू केली आहे, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिलंय.