मुंबई- ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूरने आपली मुलगी करिना कपूर खानचा दुसऱ्या मुलाचा फोटो चुकून पोस्ट केला होता. करिना आणि तिचा नवरा सैफ अली खान आपल्या नवजात मुलाला लोकांच्या नजरेपासून वाचवत आहेत. मात्र आजोबा रणधीर कपूर यांना धीर धरता आला नाही.
रणधीर कपूर यांनी 'अधीर' होऊन शेअर केला सैफिनाच्या मुलाचा फोटो गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर रुजू झालेल्या रणधीर कपूर यांनी इन्स्टाग्रमवर नातवाचा एक फोटो पोस्ट केला. होता मात्र थोड्यावेळाने ही पोस्ट हटवण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार, रणधीर कपूर यांनी इन्स्टाग्रामवर दोन मुलांचे कोलाज शेअर केले होते. रणधीरने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून हे डिलीट करण्यापूर्वी हे पोस्ट व्हायरल झाले होते आणि तैमूरसह कोलाजमधील इतर मुलगा त्याचा धाकटा भाऊ आहे असे गृहित धरण्यात आले होते.
दरम्यान, करिना अलीकडेच दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा कामावर परतली आली. यावर्षी २१ फेब्रुवारी रोजी करिना आणि सैफ यांना दुसरा मुलगा झाला होता. आंतरराष्ट्रीय महिला दिनी करिनाने तिच्या चाहत्यांना तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करताना तिच्या चिमुकल्याची झलक दाखवली होती.
हेही वाचा -