मुंबई - दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच ट्विट शेअर करत आपण पती साहिल संघीपासून विभक्त होत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर दोघांनी ११ वर्षांचं रिलेशनशिप आणि ५ वर्षांची लग्नगाठ सोडण्याचा अचानक निर्णय का घेतला याबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि एका तिसऱ्या महिलेच्या येण्याने हे सर्व घडलं असल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं. यावर आता दिया मिर्झाने प्रतिक्रिया दिली आहे.
एका महिलेमुळे झाला घटस्फोट? मीडियाच्या वृत्तावर दिया मिर्झाची प्रतिक्रिया - विनंती
दिया आणि साहिलने ५ वर्षांची लग्नगाठ सोडण्याचा अचानक निर्णय का घेतला याबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि एका तिसऱ्या महिलेच्या येण्याने हे सर्व घडलं असल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं. यावर आता दिया मिर्झाने प्रतिक्रिया दिली आहे.
हे वृत्त अफवा असल्याचे सांगत या बातम्यांमध्ये काहीही सत्य नसून आमच्या विभक्त होण्याचे कारण कोणीही तिसरी व्यक्ती नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दिया पाठोपाठ 'जजमेंटल है क्या'ची लेखिका कनिका धिल्लोनंही पतीपासून वेगळं होत असल्याचं सांगितलं, त्यामुळे या दोन गोष्टींचा संबंध जोडला जाऊ लागला. आता कनिकानेही ट्विट करत या दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. मुळात आतापर्यंत मी दिया किंवा साहिलला आयुष्यात एकदाही भेटली नसल्याचे तिने म्हटले आहे.
तर दियानेही कनिकाला पाठिंबा देत, एका महिलेच्या नात्यानं मी दुसऱ्या महिलेसाठी उभा राहत आहे, कारण खोटी बातमी बनवण्यासाठी एका महिलेच्या नावाचा वापर करणे हा गैरजबाबदार पणा आहे, असं दियानं म्हटलं आहे. यासोबतच तिनं माध्यमांना पुन्हा एकदा विनंती केली आहे, की आम्हाला सध्या एकांताची गरज आहे. आशा करते, की तुम्ही या विनंतीचा मान राखाल.