मुंबई - अभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल संघा यांनी पाच वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. तर ११ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अशात आता दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दिया मिर्झाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यासोबतच तिने सध्या याबाबत काहीही प्रश्न विचारु नका, आमच्या भावनांचा आदर राखा असे आवाहन केले आहे.
दिया मिर्झाने साहिलसोबतची ११ वर्षांची रिलेशनशिप-पाच वर्षांची लग्नगाठ सोडली, सोशल मीडियावर केले 'असे' आवाहन - पोस्ट
इथून पुढे आमचा प्रवास दोन वेगवेगळ्या रस्त्याने होणार असला, तरी आम्ही आतापर्यंत एकमेकांसोबत घालवलेले क्षण हे आमच्यासाठी नेहमीच खास असतील. सध्या आमच्या भावनांचा मान राखत या मुद्द्यावर काहीही प्रश्न करू नका, असं दियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दियाने पोस्टमध्ये म्हटलं, ११ वर्ष एकमेकांसोबत घालवल्यानंतर आम्ही मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि संपूर्ण प्रेम आणि सन्मानासोबत एकमेकांसाठी प्रत्येक परिस्थितीत हजर राहू. इथून पुढे आमचा प्रवास दोन वेगवेगळ्या रस्त्याने होणार असला, तरी आम्ही आतापर्यंत एकमेकांसोबत घालवलेले क्षण हे आमच्यासाठी नेहमीच खास असतील.
आमच्या या प्रवासात आमची साथ देण्यासाठी मी सर्व मित्रांचे, कुटुंबीयांचे आणि माध्यमांचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानते आणि एक विनंती करते, सध्या आमच्या भावनांचा मान राखत या मुद्द्यावर काहीही प्रश्न करू नका. या विषयावर आता आम्हाला काहीही बोलायचं नसल्याचं तिनं म्हटलं आहे.