महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गंगूबाई काठियावाडी'तील नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज - गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील ढोलिडा गाणे

आलिया भट्टने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवर 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील 'ढोलिडा' या पहिल्या गाण्याचा टीझर शेअर केला होता. आलियाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले होते की, हे गाणे गुरुवारी (10 फेब्रुवारी) रिलीज होणार आहे. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटचीही आठवण तिने करुन दिली आहे.

नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज
नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज

By

Published : Feb 10, 2022, 1:32 PM IST

मुंबई- आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'चा ट्रेलर येताच खळबळ उडाली होती. ट्रेलरमधील आलियाचा लूक आणि अभिनयामुळे लोकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता 10 फेब्रुवारीला 'ढोलिडा' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात आलिया भट्टचा 'गरबा डान्स' अवतार पाहायला मिळत आहे. याआधी ९ फेब्रुवारीला या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला होता.

आलिया भट्टने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवर 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील 'ढोलिडा' या पहिल्या गाण्याचा टीझर शेअर केला होता. आलियाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले होते की, हे गाणे गुरुवारी (10 फेब्रुवारी) रिलीज होणार आहे. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटचीही आठवण तिने करुन दिली आहे.

या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले असून हे गाणे जान्हवी श्रीमंकर आणि शेल हाडा यांनी गायले आहे. क्रिती महेशने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील संगीत संजय लीला भन्साळी यांचे आहे.

हेही वाचा -Amol Palekar In Hospitalized : अमोल पालेकर रुग्णालयात, आरोग्याबाबत समोर आली 'ही' महत्वाची माहिती

यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर रिलीज होताच देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आलिया भट्टने ट्रेलरमध्ये सर्व जागा व्यापली आहे आणि अजय देवगण एका सीनमध्ये जबरदस्त दिसत आहे.

आलियाच्या गंगूबाई या पात्राचे आणि अभिनयाचे तिच्या चाहत्यांकडून मनापासून कौतुक केले गेले. ट्रेलरला एका दिवसात करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांच्या एवढ्या प्रेमाबद्दल आलियाने आभार मानले. आलियानेही एक फोटो शेअर केला आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील एक न पाहिलेला फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आणि लिहिले, 'चांद पे चार चांद लगा दिए आपके प्यार ने'.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -'मॅरी मी'च्या प्रीमियरमध्ये झळकले 'लव्हबर्ड' जेनिफर लोपेझ आणि बेन अॅफ्लेक

ABOUT THE AUTHOR

...view details