मुंबई -जगभरात सध्या कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे. भारतातही या विषाणूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून बचावाचे संदेश देण्यासाठी सेलेब्रिटी सोशल मीडियाचा आधार घेत सुरक्षा बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
रामदास आठवलेंच्या 'कोरोना गो' या कवितेनंतर काहींनी गाणी देखील तयार केली आहेत. आपल्या गाण्याच्या माध्यमातून हे कलाकार जनजागृती करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अतरंगी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेली ढिंचॅक पूजाही यामध्ये मागे नाही. तिनेही कोरोनावर गाणे तयार करून नागरिकांना कोरोनापासून कसा बचाव करावा, हे सांगितले आहे.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येतायेत