महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लकी'चा व्हिलन बनला अजय देवगणचा मावळा - Dharyashil debut in Bollywood

'तानाजी' या आगामी चित्रपटातून धैर्यशील बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर वावरलेल्या धैर्यशीलसाठी ही मोठी संधी आहे. तो या चित्रपटात अजय देवगणसोबत मावळ्याची भूमिका साकारणार आहे.

धैर्यशील

By

Published : Jul 6, 2019, 4:01 PM IST


संजय जाधव यांच्या ‘लकी’ सिनेमामध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता धैर्यशील आता मराठी सिनेमांनंतर बॉलिवूडकडेही वळणार आहे. अजय देवगणच्या 'तानाजी' सिनेमात धैर्यशील तानाजीच्या सैन्यातल्या मावळ्याच्या भूमिकेत दिसेल.

‘गोष्ट एका जप्तीची’, ‘एकाच ह्या जन्मी जणू’ या टीव्ही मालिकांमधून झळकलेल्या धैर्यशीलने अवधूत गुप्तेच्या ‘एक तारा’ चित्रपटातही काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धैर्यशील 'तानाजी' ही एक मोठी संधी मानतो.

धैर्यशील म्हणतो, “कोणत्याही अभिनेत्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम करणं, हे स्वप्नवत असतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यावर मी मराठी नाटक, मालिका, शॉर्ट फिल्म आणि कमर्शिअल फिल्म्समध्ये छोट्या-मोठ्या भूमिका वठवत गेलो. तेव्हा कधी ना कधी ग्लॅमरवल्डमधल्या मोठ्या स्टार्ससोबतही आपण काम करावं ही इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण होतेय.”

तानाजीविषयी विचारल्यावर धैर्यशील म्हणतो, “मी आत्ताच माझ्या भूमिकेविषयी जास्त बोलू शकत नाही. सध्या सिनेमावर कसून मेहनत घेतोय. आणि मिळालेल्या संधींचं सोनं करण्याची इच्छा आहे. “

ABOUT THE AUTHOR

...view details