मुंबई - बॉलिवूडचा 'ही मॅन' धर्मेंद्र आपला 85 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. या खास प्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिशय सुंदर मार्गाने दिल्या आहेत. हेमा मालिनी यांनी जुन्या आणि आजच्या ट्वीटचा एक फोटो शेअर केले आहे, "तेव्हा आणि आता. आपल्या आदर, आशीर्वाद आणि प्रेमामुळे आम्हा सर्वांना तुम्ही एकत्र ठेवले आहेत., असे त्यांनी लिहिले आहे.
धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल यांनी लिहिले आहे, "वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा. एक उत्तम कलाकार आणि जगातील सर्वोत्कृष्ट माणूस म्हणून जग तुमच्यावर प्रेम करते. नेहमी आनंदी राहा. आपल्याला फक्त असेच आनंदी पाहायचे आहे. आम्हाला तुमचे सर्व दुःख द्या. पापा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. "
त्यांचा लहान मुलगा बॉबी देओलने लिहिले की, "लव्ह यू बाबा..हॅप्पी बर्थडे."
हेही वाचा -अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक