मुंबई - बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्रने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फार्महाऊसवरील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आपल्या फार्महाऊसमध्ये गाडी चालवताना दिसत आहेत. यात ते आपल्या गाई म्हशींना शेतात चारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलाय.
हा व्हिडिओ सामायिक करताना धर्मेंद्रने लिहिले आहे, ' दोस्तांना प्रेमच प्रेम मिळते या मुक्या मित्रांसोबत. चांगल्या गवताची मेजवानी आहे. जिथे गवत दिसते तिकडे घेऊन जातो आपल्या या साथिदारांना" अशा प्रकारे धर्मेंद्र यांनी आपले गुरांवरचे प्रेम व्यक्त केलंय.