मुंबई - 'ही-मॅन' धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी काही फोटो, व्हिडिओ शेअर करीत असतात. त्यांच्या या शेअरींगला लोकही भरपूर प्रतिसाद देतात. सध्या त्यांनी एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलाय, त्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोत ते जीपच्या बॉनेटवर बसले आहेत. हातात बंदुक आहे. पण, ती त्यांनी काठीसारखी पकडली आहे. त्यांच्या मार्गावर एक वाघ आलाय. आपल्या हिंमतीवर ते वाघाला आवाज देताना दिसतात. 'माँ' या चित्रपटातील हे दृष्य आहे. यात जीवंत वाघाशी सामना धर्मेंद्र यांनी केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''त्याचा आशिर्वाद आहे की, माझ्यासमोर बसलेल्या वाघासमोर शूटींग करु शकलो.'' 'माँ' चित्रपटाच्या शूटींगचा अनुभव त्यांनी या फोटोतून शेअर केला आहे.