मुंबई- 'ड्रिम गर्ल' आणि आता भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वी 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत 'स्वच्छता मोहीम' राबवली होती. इतर भाजप खासदारांसोबत हेमानीही संसदेच्या परिसरात 'स्वच्छता मोहीम' राबवताना दिसल्या होत्या. ज्यावर धर्मेंद्र यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिली होती. मात्र, आता त्यांनी ट्विट शेअर करत याबद्दल हेमा यांची माफी मागितली आहे.
काहीही बोलून गेलो..मी व्यक्त केलेल्या भावनेचा लोकांनी वेगळाच अर्थ घेतला आहे. इथून पुढे झाडूचीही गोष्टही कधीच नाही करणार. हम का माफी दई दो मालिक, असं ट्विट करत धर्मेंद्र यांनी आपला एक जूना हात जोडलेला मजेशीर फोटो पोस्ट केला आहे.