करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन सोशल मीडियाचा वापर करणार समाज कल्याणासाठी! - dharma
करण जोहरने गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात अनेकांची मदत केली होती आणि आता तो आपली निर्मितीसंस्था धर्मा प्रॉडक्शनच्या सोशल मीडियाचे पेज सामाजिक कल्याणासाठी वापरणार आहे. धर्मा प्रोडक्शन्सची सोशल मीडिया पेजेस आता कोविड-१९ संबंधित लसीकरण प्रक्रिया आणि मानसिक आरोग्याविषयी माहितीसाठी वापरली जातील.
![करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन सोशल मीडियाचा वापर करणार समाज कल्याणासाठी! करण जोहर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11692529-841-11692529-1620522931834.jpg)
मुंबई -गेल्या वर्षीपासून कोरोना संकट आपल्याला सतावत आहे. त्यावर नियंत्रण मिळवत असताना कोरोनाने आता दुपट्ट ताकदीने भारतावर हल्ला केला आहे. वैद्यकीय सेवांवरील ताण वाढला असून लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरदेखील परिणाम होताना दिसतोय. करण जोहरने गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात अनेकांची मदत केली होती आणि आता तो आपली निर्मितीसंस्था धर्मा प्रॉडक्शनच्या सोशल मीडियाचे पेज सामाजिक कल्याणासाठी वापरणार आहे. धर्मा प्रोडक्शन्सची सोशल मीडिया पेजेस आता कोविड-१९ संबंधित लसीकरण प्रक्रिया आणि मानसिक आरोग्याविषयी माहितीसाठी वापरली जातील.