मुंबई - निर्माता, दिग्दर्शन आणि बरेच काही करणारा करण जोहरने अजून एक व्यवसाय सुरु केला असून त्यातून चित्रपटसृष्टीला नवीन टॅलेंटेड कलाकार देण्यात येणार आहेत. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी या नवीन कंपनी मार्फत ‘बुलबुल’ चित्रपटातील हिरॉईन तृप्ती डिमरीची पहिली निवड करण्यात आली आहे. ‘बुलबुल’ हा चित्रपट अभिनेत्री व निर्माती अनुष्का शर्माने तिच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’च्या बॅनरखाली बनविला होता व तृप्ती डिमरीच्या अभिनयाची भरपूर तारीफ झाली होती. मिस डिमरीने पोस्टर बॉईझ मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं, जो मराठमोळ्या श्रेयस तळपदेने दिग्दर्शित केला होता आणि तो मराठी पोश्टर बॉईझचा रिमेक होता. तिच्या सुंदरपणाची फिल्मी वर्तुळात चर्चा आहे.
धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीने निवडले पहिले दोन कलाकार! - धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए)
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेनंतर करण जोहरने आता टॅलेंट शोधणारी नवी संस्था स्थापन केली आहे. धर्मा कॉर्नरस्टोन असे नाव असलेल्या या एजन्सीने दोन गुणी कलाकार बॉलिवूडसाठी शोधले आहेत.
धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी
हेही वाचा - रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण