मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवली. 'कोलावरी डी' गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या धनुषचा आज ३६ वा वाढदिवस. त्याचं खरं नाव व्यंकटेश प्रभू असं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया धनुषबद्दलच्या काही रंजक गोष्टी.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होता. मात्र, नंतर भाऊ आणि दिग्दर्शक सेलाघनच्या आग्रहानंतर त्याने अभिनयास सुरुवात केली. वडिलांच्याच 'थल्लुवढो लिमाई' चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नाही. धनुषने 'रांझना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'कोलावरी डी' गाणं धनुषने केवळ सहा मिनीटात लिहिलं होतं. या गाण्याला यूट्यूबवर गोल्ड अॅवॉर्डने सन्मानित केलं गेलं. धनुष एक उत्तम अभिनेता, निर्माता, गायक आणि डान्सर आहे. त्याने आतापर्यंत अनेक तमिळ गाणे लिहिले आणि गायले आहेत.