महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

83 Tax Free in Delhi : 83 चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा दिल्ली राज्य सरकारचा निर्णय - Kapil Dev Led Cricket Team

कपिल देवच्या नेतृत्वाखाली ( Kapil Dev Led Cricket Team )1983 मध्ये पहिल्यादाच भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 हा चित्रपट ( 83 Movie ) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री ( 83 Tax Free in Delhi )करण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारने ( Delhi State Government Decides ) घेतला आहे.

83 चित्रपटातील फोटो
83 चित्रपटातील फोटो

By

Published : Dec 21, 2021, 10:59 PM IST

नवी दिल्ली - कपिल देवच्या नेतृत्वाखाली ( Kapil Dev Led Cricket Team ) 1983 मध्ये पहिल्यादाच भारतीय क्रिकेट संघाने ( Indian Cricket Team ) विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 हा चित्रपट ( 83 Movie ) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री ( 83 Tax Free in Delhi ) करण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारने ( Delhi State Government Decides ) घेतला आहे.

'83' या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा गेल्या वर्षीपासून लागून राहिली आहे. 1983 ला जिंकलेल्या विश्वचषकाचा थरार थिएटरमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे क्रिकेट रसिकांसह सिनेरसिकही वाट पाहात आहे. अखेर या चित्रपटाचे प्रदर्शन यावर्षी ख्रिसमसला होणार आहे. हा चित्रपट आता दिल्लीकरांना टॅक्स फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे.

१९८३ साली झालेल्या विश्वचषक सामन्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. २५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत.

हेही वाचा - 'बॅन लिपस्टिक'चे गुपित आले समोर, 'अनुराधा' वेब सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद...

ABOUT THE AUTHOR

...view details