मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहरने त्याच्या घरी जोरदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे तारे तारका हजर होते. यात शहिद कपूर,रणबीर कपूर, दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर, वरुण धवन, विकी कौशल या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. या पार्टीच्या यजमानाने व्हिडीओ शेअर केला. मात्र, त्यावरुनच नव्या वादाला जन्म मिळाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे आमदार मजींदर एस. सिरसा यांनी यांनी करण जोहरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी शीर्षक दिलंय, 'फिक्शन व्हर्सेस रियॅलिटी.'
त्यांनी पुढे लिहिलंय, ''पाहा, बॉलिवूडचे हे सितारे किती अभिमानाने ड्रग सेवन करतना दिसतात. बॉलिवूड स्टार्सकडून ड्रग घेण्याच्या गैरवर्तनाच्या विरुध्द मी आवाज उठवत आहे. जर तुम्हाला ही गोष्ट तिरस्काराची वाटत असेल तर रिट्विट करा", असे म्हणत मजींदरने शाहिद, दीपिका, अर्जुन कपूर, वरुण, करण आणि विक्की कौशल यांना टॅग केले आहे.