दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट शुक्रवारी देशभरात रिलीज होतोय. 'छपाक' चित्रपटाला मध्ये प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा निर्णय जाहीर केला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
यापाठोपाठ छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करीत 'छपाक' ला करमुक्त केल्याची घोषणा केलीय.
मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन असलेला 'छपाक' हा चित्रपट अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी दीपिका जेएनयूमध्ये गेली होती. हे काही लोकांना पटले नाही. त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्ये प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने 'छपाक' टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 'छपाक' टीमला दिलासा मिळालाय.