मुंबई- बॉलिवूड दिवा दीपिका पदुकोण तिच्या अलीकडच्या एअरपोर्ट लूकमुळे ट्रोल होत आहे. रविवारी मुंबईतील कलिना विमानतळावर अभिनेत्री दीपिका अवतरली होती. दीपिकाने ऑल-डेनिम लूक निवडला जो नेटिझन्सना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरला आहे.
शलीना नथानीने स्टाइल केलेली दीपिका विमानतळावर डेनिम-ऑन-डेनिम लूकमध्ये दिसली. दीपिकाचा एअरपोर्ट लुक एका मोठ्या आकाराच्या निळ्या डेनिम क्विल्टेड जॅकेटचा होता जो मॉम जीन्ससोबत जोडलेला होता. फॅशनसाठी प्रसिध्द असलेली दीपिकाच्या या एअरपोर्ट लूकवर नेटिझन्सनी भरपूर टीका केली आहे.
दीपिकाचा लेटेस्ट एअरपोर्ट लूक व्हायरल झाल्यानंतर लगेचच कीबोर्ड वॉरियर्सने तिच्या पोशाखासाठी हल्ला बोल चढवला. एका युजरने लिहिले, "रणवीर के कपडे पहन लिए क्या दीदी." तर दुसर्याने प्रश्न केला, "टाचेला काय झालंय?". दीपिकाने टाचांवरही मोजे घालण्यावरुनही काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.