महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हॉलिवूडच्या बॅनरसोबत दीपिका पदुकोण करणार ''क्रॉस-कल्चरल सिनेमा''ची निर्मीती - दीपिका पदुकोणचे ''का प्रॉडक्शन हाऊस''

दीपिका पदुकोण आगामी आंतरराष्ट्रीय क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीमध्ये भूमिका साकारणार आहे. इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचा विभाग असलेल्या एसटीएक्सफिल्म्सने ही घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

By

Published : Aug 31, 2021, 6:54 PM IST

मुंबई-अभिनेत्री दीपिका पदुकोण इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचा विभाग असलेल्या एसटीएक्स फिल्म्सद्वारे निर्माण होणाऱ्या आगामी क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीमध्ये अभिनय करणार आहे. इरोस स्टुडिओने मंगळवारी ही घोषणा केली. दीपिका पदुकोणचा बॅनर ''का प्रॉडक्शन''ही याचे सहनिर्माते असणार आहे.

या चित्रपटाची घोषणा एसटीएक्सफिल्म्स मोशन पिक्चर ग्रुपचे अध्यक्ष अॅडम फोगेलसन यांनी केली आहे. स्टुडिओ टेंपल हिल प्रॉडक्शन्स, विक गॉडफ्रे आणि निर्माता मार्टी बोवेन यांच्याशी वाटाघाटी करीत आहेत

हा चित्रपट दीपिका पादुकोणच्या व्यक्तीरेखेभोवती फिरणारा "व्यापक क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडी" चित्रपट असेल. फॉगेलसनने दीपिकाला भारताची सर्वात मोठी ग्लोबल स्टार असल्याचे म्हटले आहे. तिने 2017 मध्ये ''एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज'' (XXX: Return of Xander Cage ) या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दीपिकाच्या ''का प्रॉडक्शन हाऊस'' या बॅनर तर्फे 2020 मध्ये छपाक' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आगामी कबीर खान दिग्दर्शित 83 आणि हॉलीवूड चित्रपट 'द इंटर्न'चे आगामी हिंदी रूपांतरण यासारख्या चित्रपटांनादेखील तिच्या का प्रॉडक्शन हाऊसचे सहकार्य असेल. दीपिका पादुकोण धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या व शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटात (अद्याप शीर्षक ठरलेले नाही) आणि शाहरुख खानची भूमिका असलेल्या सिद्धार्थ आनंदच्या पठाण या अॅक्शनपटात झळकणार आहे.

हेही वाचा - 'बजरंगी भाईजान' फेम खऱ्या चांद नवाबच्या ''कराचीसे'' व्हिडिओला 46 लाखांची बोली

ABOUT THE AUTHOR

...view details