मुंबई- अभिनेता ऋषी कपूर गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये उपाचार घेत आहेत. या दरम्यान अनेक कलाकारांनी त्यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेत सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं. यापाठोपाठ आता रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकानेही ऋषी कपूर यांची भेट घेतली आहे.
रणबीरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकानं घेतली ऋषी कपूर यांची भेट - girlfriend
ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे ‘मेट गाला २०१९’साठी न्यूयॉर्कला गेलेल्या दीपिकाने त्यांची भेट घेतली आहे. नीतू कपूरने यावेळचा फोटो शेअर केला आहे.
नीतू कपूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ऋषी कपूर आणि दीपिकासोबतचा एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. दीपिकासोबत घालवलेली ही संध्याकाळ मजेशीर होती, असं कॅप्शन नीतू कपूर यांनी या फोटोला दिलं आहे.
दरम्यान ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असले, तरी नेमकं कोणत्या आजारावर ते उपचार घेत आहेत याबद्दल कोणतीही माहिती कपूर कुटुंबीयांनी दिली नव्हती. यासोबतच ऋषी यांना कॅन्सर असल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले होते. अशात नुकतंच राहुल रवैल यांनी ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिल्यानं त्यांना कॅन्सर असल्याचं निश्चित झालं.