महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीपिका पदुकोण आणि ह्रतिक आगामी चित्रपटात एकत्र झळकणार?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हँडसम हंक हृतिक रोशन आगामी चित्रपटासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सोशल मीडियावर हृतिकने दीपिकाला ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्याला दीपिकाने जे उत्तर दिले त्यावरुन हा तर्क काढण्यात येत आहे.

deepika-padukone-hrithik-roshan
दीपिका पादुकोण आणि हँडसम हंक हृतिक रोशन

By

Published : Jan 8, 2021, 2:18 PM IST

मुंबई- बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन आता एकत्र चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना जो संदेश लिहिला त्यावरुन हे दोघे लवकरच एका चित्रपटात काम करतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

पादुकोणने आपला ३५ वा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा केला. दीपिकाच्या या खास दिवशी तिच्या सोशल मीडिया पेजवर सेलिब्रिटी, चाहते आणि मित्रांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी पदुकोणवर प्रेम व्यक्त केले. यासर्वात लक्ष वेधणारी ठरली ती ह्रतिक रोशनची कॉमेंट. ह्रतिकच्या शुभेच्छाला उत्तर देताना जे दीपिकाने लिहिले त्यावरुन दोघे लवकरच स्क्रिन स्पेश शेअर करील असा तर्क काढण्यात आलाय.

ह्रतिक रोशनने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाला उत्तर देताना दीपिकाने लिहिले की, "खूप आभारी आहे ह्रतिक! आता काही दिवसात आणखी एक मोठे सेलेब्रिशन होणार आहे...!" दीपिकाच्या या ट्विटमुळे दोघेही एका चित्रपटात काम करतील असा तर्क लावण्यात येत आहे.

१० जानेवारीला ह्रतिक रोशनचा वाढदिवस असतो. त्यामुळेही दीपिकाने असे उत्तर दिलेले असू शकते. मात्र चाहत्यांनी आणि मीडिया रिपोर्ट्सनी याचा आपल्या सोयीची अर्थ काढलेला असू शकतो.

हेही वाचा -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात होणार हजर

दरम्यान, दीपिका पदुकोण आगामी '83' या चित्रपटात पाहायला मिळेल. कबीर सिंग दिग्दर्शित या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. तर दीपिकाचा पती रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर ती शकुन बात्रा याच्या अद्याप शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात काम करणार असून यात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असतील.

हेही वाचा -बंगाल विधानसभा : काँग्रेस आणि डाव्या पक्षांची कोलकात्यात संयुक्त रॅली

ABOUT THE AUTHOR

...view details