बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने दोघांनी तिरुपती येथील बालाजी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले.
लग्नाचा पहिला वाढदिवस : रणवीर दीपिका पोहोचले तिरुपती दर्शनाला - Ranveer Singh latest news
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण. उभयतांनी घेतले तिरुपतीत जाऊन बालाजीचे दर्शन
रणवीर दीपिकाचे लग्न इटली येथे एक वर्षापूर्वी पार पडले होते. या हाय प्रोफाईल विवाह सोहळ्याला मोजकेच निमंत्रीत उपस्थित होते. दोन दिवस हा शाही विवाह सोहळा पारंपरिक पध्दतीने पार पडला होता. कोंकणी आणि सिंधी पध्दतीने हे लग्न पार पडले. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्यांनी तिरुपतीच्या दर्शनाने साजरा केला.
आज सकाळी तिरुपतीत पोहोचलेल्या रणवीर दीपिकाने व्हीआयपी मार्गाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातील पुजाऱ्याने दोघांनाही रंगनायका मंडपममध्ये वेद आशिर्वचनम दिले. दोघेही पारंपरिक वस्त्रे परिधान करुन दर्शनासाठी आले होते. उद्या अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिरात आपला माथा ते टेकवणार आहेत.