महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीपिका-रणवीर परदेशवारीसाठी सज्ज, पासपोर्ट शेअर करत दिली माहिती - Deepika Padukon latest news

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या बॉलिवूडमधील एनर्जिक जोडप्याने परदेशवारीची तयारी केलीय. आपल्या पासपोर्टचा फोटो शेअर करीत त्यांनी चाहत्यांना याची कल्पना दिलीय.

DeepVeer
दीपवीरr

By

Published : Feb 7, 2020, 5:03 PM IST


मुंबई - बी - टाऊन मधील लोकप्रिय जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी सुट्टीसाठी जात असल्याचे जाहीर केले आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत ही माहिती दिली.

शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन पासपोर्ट दिसत आहेत. 'छपाक'च्या अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''त्याची आणि तिची...सुट्टी.''

या जोडीने गेल्यावर्षी १४ नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. दोघांनी पारंपरिक दाक्षिणात्य पध्दतीने विवाह केल्यानंतर उत्तर भारतीय विधीनुसारही विवाह केला होता.

संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांसह अनेक चित्रपटातून एकत्र भूमिका केल्या आहेत.

कामाच्या पातळीवर दीपिकाचा अलिकडेच 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. रणवीर सिंग आगामी '८३' या चित्रपटात काम करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details