मुंबई -कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात वाऱ्यासारखा होत असून प्रत्येक देश आपल्यापरीने यावर उपाययोजना करत आहे. कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नये, यासाठी विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी प्रबोधनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या #SafeHands Challenge हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. हे चॅलेंज स्वीकारुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक मिनिटाच्या व्हिडिओत सचिन, कशा पद्धतीने स्वच्छ हात धुतले पाहिजे याचे प्रात्याक्षिक दाखवले आहे. त्याच्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही हे चॅलेंज स्वीकारत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे जिम बंद ; जॅकलिन, कॅटरिनाने निवडला 'हा' पर्याय