मुंबई - 'छपाक' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या दीपिका पदुकोणने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तिचा आगामी चित्रपट हॉलिवूडच्या 'द इन्टर्न'चा हिंदी रिमेक असेल. या चित्रपटात दीपिकासह ऋषी कपूर यांचीही महत्त्वाची भूमिका असेल. या चित्रपटासाठी उत्साहित असल्याचे दीपिकाने म्हटले आहे.
'द इन्टर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार ऋषी कपूरसह दीपिका पदुकोण - 'द इन्टर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार ऋषी कपूरसह दीपिका पदुकोण
'द इन्टर्न' या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदीत रिमेक होणार आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेता ऋषी कपूर आमि दीपिका पदुकोण काम करणार आहेत.
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन ही घोषणा केली आहे. ऋषी कपूर यांनीही ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. पुढचा प्रवास 'द इन्टर्न'चा हिंदी रिमेक असेल. यात सोबतीला दीपिका पदुकोण असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
दीपिकाचा 'छपाक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अॅसिड हल्ल्यात वाचलेल्या महिलेची ही संवेदनशील कथा आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर प्रेम दिले. ऋषी कपूर गेली वर्षभर रुपेरी पडद्यापासून दूर होते. आजारपणासाठी ते अमेरिकेत उपचार घेऊन परतले आहेत आणि सिनेमांसाठी ते पुन्हा सज्ज झालेत.