'ती सध्या काय करते'..असा प्रश्न तिच्या करोडो चाहत्यांना पडलाच असेल. आम्ही बोलतो आहोत ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणबाबत..देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरून काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव देखील यात सामील झालं आहे.
लॉकडाऊनच्या काळात...'दीपिका सध्या काय करते' - दीपिका पादुकोण
देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घरून काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव देखील यात सामील झालं आहे. 'ती सध्या काय करते'..हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय.
दीपिका सध्या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन स्क्रिप्ट्स नरेशन घेण्यात आपला वेळ खर्च करते आहे. दीपिका एक कलाकार म्हणून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करत आहे. त्यासाठीच सध्या तिच्या अनेक चित्रपट निर्मात्यांसोबतच्या वर्चुअल मीटिंग्ज सुरू आहेत. हा दीपिकासाठी थोडा नवा नवा आणि डिजिटल पर्याय असला तरीही तो तिने चांगलाच आत्मसात केलेला आहे. दीपिका यासोबत यापूर्वी जाहीर झालेल्या सिनेमातील भूमिकांसाठीदेखील स्वतःला तयार करते आहे. त्यासोबत आगामी काळात करायचे प्रोजेक्ट्स देखील ठरवून ठेवत आहे आणि कमी वेळेत सोशल डिस्टनसिंगचे सगळे नियम पाळूनदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे ते तिला सहज शक्य होत आहे.
जर देशभरात लॉकडाउन नसता, तर दीपिका श्रीलंकेत दिग्दर्शक शकुन बत्राच्या आगामी अनटाइटल्ड सिनेमाचं शूटिंग करत असती, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील दिसणार आहेत. आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात, दीपिकाने प्रेक्षकांना अनेक उत्तम चित्रपट देऊन त्यात अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. यात 'पिकू', 'ये जवानी है दीवानी' मधील नैना, 'बाजीराव मस्तानी' मधील 'मस्तानी', 'कॉकटेल'ची 'वेरोनिका' आशा अनेक भूमिकांचा समावेश होतो. या भूमिका पडद्यावर जिवंत करून दीपिकाने जगभरात आपले कोट्यवधी चाहते तयार केले आहेत. तिची अदाकारी आणि आपल्या व्यक्तिरेखांना आकार देण्याची तिची हातोटी त्यामुळेच कौतुकाचा विषय ठरला आहे.