महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरसच्या भितीने दीपिकाने रद्द केला पॅरिस फॅशन वीकचा दौरा - Deepika padukon latest news

जगभर कोरोना व्हायरसने कहर माजलाय. चीनमधून जगभर हा खतरनाक व्हायरस पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये होणाऱ्या फॅशन वीकला हजर न राहण्याचा निर्णय दीपिकाने घेतलाय.

Deepika
अभिनेत्री दीपिका पदुकोण

By

Published : Mar 2, 2020, 11:56 PM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपला पॅरिसचा दौरा रद्द केला आहे. पॅरिस फॅशन वीकसाठी ती जाणार होती. मात्र कोरोना व्हायरसच्या भितीने तिने हा दौरा रद्द केला.

लुई वीटॉन द्वारे आयोजित लग्झरी फॅशन वीकसाठी दीपिका पदुकोणाला आमंत्रीत करण्यात आले होते. ३ मार्चपर्यंत हा शो चालणार होता.

कोरोना व्हायरसच्या भितीने दीपिकाने आपले पॅरिसला जाणे टाळले आहे.

दीपिकाच्या प्रवक्त्याने ही माहिती मीडियाला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details