मुंबई - सुशांतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसलाय. १४ जूनला त्याने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही महिन्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता. त्याने वेळेवर औषधेही घेतली नव्हती, असे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा सुशांत शिकार ठरला अशी टीका काहीजण करीत आहेत.
नेपोटिझ्मच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. सगळ्याबाजूने युजर्स विरोध करीत आहेत. तर काहीजण याला जबाबदार करण जोहरसह काही कलाकार असल्याचे सांगत आहेत. हा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. मात्र आता एक मोहिम चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा फटका करण जोहर आणि आलियाच्या फॉलोअर्सच्या संख्येवर पडला आहे.
हेही वाचा - व्हिडिओ व्हायरल : सुशांतच्या हत्येला 'मुव्ही माफिया' जबाबदार, कंगनाचा आरोप