मुंबई - आज भारतीय संगीत विश्वातील अनमोल रत्न मोहम्मद रफी यांची चाळीसावी पुण्यतिथी आहे. रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात झाला होता. रफी यांच्यावर एका फकिराने गायलेल्या गाण्याचा मोठा प्रभाव पडला होता. त्या फकिराने गायलेली गाणी ते लक्षपूर्वक ऐकत असत. यातूनच त्यांच्यात संगीताची गोडी निर्माण झाली. 31 जुलै 1980 साली त्यांचा मृत्यू झाला. चाळीस वर्षांनंतरही त्यांच्या जादुई आवाजाने आजही श्रोत्यांचे कान तृप्त होत आहेत.
पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या काही संस्मरणीय गाण्यांवर नजर टाकू..
विजय आनंदच्या काला बाजार चित्रपटातील खोया खोया चांद खुला आसमान, हे गाणे देव आनंद आणि वहिदा रेहमानवर चित्रीत करण्यात आले होते. 1960 मध्ये रिलीज झालेलं हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं.
द ट्रेन चित्रपटातील गुलाबी आँखें जो तेरी देखी या सुपरहिट गाण्यासाठी मोहम्मद रफी यांचे कौतुक झाले होते.
1971 च्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाचे हिट ट्रॅक 'नफरत की दुनिया को छोड के' आजही सर्वांच्या आवडीचे आहे. गाण्याचे विषाद सूर प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेमाचे बंधन व्यक्त करतात.
शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं बदन पे सितारे लपेटे हुये, हे गाणे आजही सर्वांच्या आवडीचे आहे.
शक्ती सामंताच्या 1970 साली रिलीज झालेल्या पगला कही का या चित्रपटातील तुम मुझे यूं भूला ना पाओगे, हे गाणे मोहम्मद रफिंच्या सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते. हे गाणे शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.