महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दे दे प्यार दे'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, जाणून घ्या आकडे - rakul preet

या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.४१ कोटींची कमाई केली होती.

'दे दे प्यार दे'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ

By

Published : May 19, 2019, 2:54 PM IST

मुंबई- अजय देवगण, रकुल प्रीत आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला 'दे दे प्यार दे' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात वाढ झाली आहे.

शनिवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.४१ कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या दिवशी १३.३० कमाई चित्रपटाने केली आहे. सिनेमाने २ दिवसात २३.८० कोटींचा आकडा गाठला आहे.

या चित्रपटात अजयने एका ५० वर्षीय आशिश नावाच्या व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. तर रकुलने त्याच्या २६ वर्षाच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तब्बू या चित्रपटात अजयच्या पूर्वश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली असून या हटके लव्हस्टोरीला आता प्रेक्षक आणखी किती प्रतिसाद देतात आणि चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details