मुंबई - शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटाला 20 ऑक्टोबर रोजी हिंदी चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण करणार आहे. अभिनेता उदय चोप्रा याने चित्रपटाच्या सेटवर सहायक म्हणून काम केले होते. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये 'बिहाइंड सीन' (बीटीएस) व्हिडीओ प्रथा कशी सुरू केली, याची आठवण जागवली आहे. उदयचा मोठा भाऊ आदित्य चोप्रा याने दिग्दर्शित केलेला डीडीएलजे हा पहिला चित्रपट आहे.
उदय म्हणाले, "आदित्यला 'डीडीएलजे' चित्रपटात असे काहीतरी करायचे होते, जे यापूर्वी भारतातील कोणीही केले नव्हते. त्यांनी मला 'मेकिंग' दिग्दर्शित करण्याची जबाबदारी दिली होती. असे पूर्वी कधी घडले नव्हते. त्यामुळे मला यासाठी अनेक गोष्टींचा शोध घ्यावा लागला. कॅलिफोर्नियातून फिल्मचे शिक्षण घेऊन परतल्यानंतर माझ्यासाठी हात साफ करण्याची ही उत्तम संधी होती.''