टी-सिरीजच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये अभिनेता दर्शन कुमार दिसणार आर माधवन सोबत! - टी-सिरीज अपकमिंग मुव्ही न्यूज
अभिनेता दर्शन कुमारने टी-सिरीज निर्मित एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासाठी, विचारणा झाल्यावर होकार कळविला आहे. महत्वाचं म्हणजे तो या चित्रपटाद्वारे आर माधवन सोबत स्क्रीन शेयर करणार आहे.
![टी-सिरीजच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये अभिनेता दर्शन कुमार दिसणार आर माधवन सोबत! Darshan Kumaar joins T-Series' R Madhavan-led suspense thriller](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10433288-304-10433288-1611986507232.jpg)
मुंबई - अभिनेता दर्शन कुमारने प्रियांका चोप्रा अभिनित ‘मेरी कॉम‘ मधून तिच्या पतीच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंतर एनएच १०, सरबजित आणि बागी-२ यासारख्या बड्या हिंदी चित्रपटांमध्ये सहभागी होत व ताकतीचा अभिनय करत त्याने आपले बॉलिवूडमधील स्थान बळकट केलेले आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी सर्वांनाच फटका बसला. बॉलिवूडसकट अख्खी मनोरंजनसृष्टी घरात बसून होती. दर्शन कुमार देखील घरातच बसून होता परंतु नाउमेद न होता त्याने विविध गोष्टी आत्मसात केल्या व त्याच्यामते त्याच्यासाठी २०२१ हे वर्ष चांगल्या बातमीने उघडले आहे. त्याने, टी-सिरीज निर्मित एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासाठी, विचारणा झाल्यावर होकार कळविला आहे. महत्वाचं म्हणजे तो या चित्रपटाद्वारे आर माधवन सोबत स्क्रीन शेयर करणार आहे.