चेन्नई - सुपरस्टार रजनीकांतच्या 'दरबार' चित्रपटाचे नवे पोस्टर भेटीस आले आहे. शत्रूंना चारी मुंड्या चीत करुन आरामात बसलेल्या थलैवाच्या चेहऱ्यावर शौर्याचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत आहे.
रजनीकांतच्या 'दरबार'चे नवे पोस्ट रिलीज, आज प्रतीक्षा ट्रेलरची - Superstar Rajnikant
'दरबार' हा चित्रपट ९ जानेवारीला हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होईल. रजनीकांत, नयनतारा आणि सुनिल शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दरबार चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार असून मुंबईत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ए.आर. मुरुगादोस यांनी दिग्दर्शन केलेला 'दरबार' हा चित्रपट ९ जानेवारीला पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात येईल. हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होईल. रजनीकांत, नयनतारा आणि सुनिल शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दरबार चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार असून मुंबईत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चित्रपटात रजनीकांत २५ वर्षानंतर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.रजनीकांत यांनी १९९२ मध्ये 'पांडियन' या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे